सृजनमित्र २०२६

हा अंक कसा घडला

पाच यंत्रं, एकच सूचना, आणि नावं न पाहता वाचणारी माणसं.

पाच मॉडेल्स

या वर्षी ९ कथा आणि ७ कविता प्रत्येकी पाच AI मॉडेल्सनी लिहिल्या, आणि ५ परिसंवादांत ही मॉडेल्स एकमेकांशी बोलली.

मॉडेलकंपनीAPI मधलं नाव
GPT-6 AstraOpenAIgpt-6-astra
Gemini 4 ArgonGooglegemini-4-argon
Claude Opus 5.5Anthropicclaude-opus-5-5
Sarvam-105BSarvam AIsarvam-105b
GLM 5.3openrouterz-ai/glm-5.3

एकच प्रॉम्प्ट, एकच संधी

प्रत्येक मॉडेलला त्याच्या अधिकृत API मधून अगदी तोच system prompt आणि तोच prompt दिला. Web search, tools किंवा आधीच्या संभाषणांची आठवण (memory) वापरली नाही; बाकीच्या सेटिंग्ज कंपन्यांनी ठेवलेल्याच होत्या. प्रत्येक मॉडेलकडून एकच मसुदा घेतला; पुन्हा पुन्हा लिहून घेऊन त्यातला चांगला निवडला नाही. कॉल अयशस्वी झाला किंवा उत्तर रिकामं आलं, तरच पुन्हा प्रयत्न केला.

संपादकांनी कसं निवडलं

संपादक मंडळाने प्रत्येक विषयावरचे सगळे मसुदे पूर्ण वाचले. कुणी काय लिहिलं ते कुणालाच दिसत नव्हतं, आणि पर्याय प्रत्येकाला वेगळ्या क्रमाने दिसले. प्रत्येकाने सगळ्या पर्यायांचा क्रम लावला. ज्या रचनेला बहुमताने पहिला क्रमांक मिळाला, ती अंकात घेतली; गुणांची बेरीज निवडीसाठी वापरली नाही. एकाच कथेत मतं विभागली; तिथे संपादकांनी निर्णय घेतला. निवडलेली रचना ज्या मॉडेलने लिहिली, त्याचं नाव रचनेसोबत दिलं आहे.

विषयरचनामॉडेल
प्रेमकथादोन कप चहाClaude Opus 5.5
विनोदी कथा · शहरीशांतिकुंजचा अधिकृत आवाजGPT-6 Astra
विनोदी कथा · ग्रामीणवेस सरकलीClaude Opus 5.5
उपहासकथाकागदविरहित क्रांतीचा बृहत् अहवालGemini 4 Argon
गूढकथानक्कलClaude Opus 5.5
रहस्यकथादोन ते चारClaude Opus 5.5
विज्ञानकथाअनादि नादGemini 4 Argon
कौटुंबिक कथासाठाव्या वर्षीचं स्टीअरिंगClaude Opus 5.5
दीर्घकथाउंबरठाKathaForge (इंजिन)
अभंगदेवा, वेळ नाहीClaude Opus 5.5
ओवीनात चालली परमुलखीClaude Opus 5.5
गझलकिनारा दिसेनाClaude Opus 5.5
लावणीलटकाच रुसवा सजणाGemini 4 Argon
मुक्तछंदबारा अडतीसची स्लोClaude Opus 5.5
विडंबन कविताटिणटिणारीGPT-6 Astra
बालकवितारात्रीची गुपचूप दिवाळीClaude Opus 5.5

परिसंवाद कसे झाले

परिसंवादांचं सूत्रसंचालन Claude Opus 5.5 ने केलं. त्याने विषयाची मांडणी केली, आणि प्रत्येक फेरीनंतर आधीची उत्तरं वाचून पुढचा प्रश्न विचारला. प्रत्येक सहभागीला तोपर्यंतचा संपूर्ण परिसंवाद दिला जात होता.

दीर्घकथा

‘उंबरठा’ ही कथा KathaForge या इंजिनातून आलेली आहे. KathaForge हे मॉडेल नाही; लांब कथा घडवण्यासाठी बांधलेलं ते agentic इंजिन आहे. त्यावर Fable, Gemini आणि OpenAI यांच्या मॉडेल्सकडून कथा लिहून घेतल्या, आणि त्यांतून आम्ही ही एक निवडली. छापण्याआधी तिच्यावर हलकंसं मानवी संपादनही झालं आहे. हे इंजिन या अंकाचे संपादक निखिल देशपांडे यांनीच तयार केलं आहे. त्यामुळे ही कथा आम्ही कुठल्याही प्रकारच्या बेंचमार्कमध्ये मोजणार नाही.

प्रॉम्प्ट सगळ्यांसाठी खुले

प्रत्येक रचनेच्या पानावर खाली ‘प्रॉम्प्ट’ हा विभाग आहे. तो उघडला की मॉडेलला दिलेली सूचना जशीच्या तशी वाचता येते, आणि हवं तर कॉपी करून तुमच्या आवडत्या AI ॲपमध्ये वापरूनही पाहता येते.

चित्रं

प्रत्येक रचनेचं रेखाचित्र, मजकुरातली छोटी चित्रं, मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ FLUX 3 Image Klein या इमेज मॉडेलने आमच्याच संगणकावर काढली आहेत, आतली चित्रं एकाच शैलीत: गडद रेषा आणि सपाट रंग. मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ वेगळे: कॅनव्हासवर झिरपलेल्या रंगांची अमूर्त चित्रं. त्यांचं मोठं रूप SeedVR2 ने केलं.

२०२५ पासून काय बदललं

गेल्या वर्षीचा अंक आणि हा अंक शेजारी ठेवून वाचले. आधी एक फरक सांगायला हवा: गेल्या वर्षीच्या मजकुरावर आम्ही थोडं मानवी संपादन केलं होतं; यंदा दीर्घकथा सोडून एकही शब्द बदललेला नाही. मॉडेल्स आणि सूचना दोन्ही नव्या आहेत, त्यामुळे ही तुलना वाचकाला दिसणाऱ्या फरकाची आहे, काटेकोर चाचणीची नाही.

भाषेचा सहजपणा. गेल्या वर्षीचे लेख आणि कथा सुबक होत्या, पण बहुतेक एकाच प्रमाण, अलंकारिक सुरात. यंदा आवाज बदलतो. ग्रामीण कथेचा निवेदक बोलीत सुरुवात करतो: “वेस म्हंजे काय बैलगाडी हाय का, बैल जुपले की चालली?”

व्याकरण. गेल्या वर्षीच्या कवितांत “फक्त तुझं फोटो आणि मी”, “ती साधीपणा परत येईल”, “पाऊलवाट पुन्हा हसतील” अशा लिंग-वचनाच्या चुका होत्या. अशा ढळढळीत चुका यंदा कमी दिसतात. मात्र काही ठिकाणी भाषा अजूनही यांत्रिक वाटते.

हिंदी-इंग्रजी शब्द. गेल्या वर्षीच्या एका कथेत वाक्यं अशी होती: “खसाचा गंध गार असतो, धरतीसारखा, पण तो base notes ला grounding देतो”, आणि एका ठिकाणी वेलचीऐवजी “इलायची”. त्या एका कथेत रोमन लिपीतले सुमारे २९० शब्द होते. यंदाच्या पंधरा निवडलेल्या कथा-कवितांत मिळून २५, आणि त्यातले २२ एकाच उपहासकथेत, सरकारी परिपत्रकाची नक्कल करताना कंसात आलेले.

वृत्त-छंदाची जाण. गेल्या वर्षीच्या सातही कविता मुक्तछंदाच्या वळणाच्या होत्या; वृत्ताची परीक्षाच झाली नव्हती. यंदा अभंग, ओवी, गझल, लावणी आणि विडंबन मागितलं. निवडलेला अभंग सहा-सहा-सहा-चार अक्षरांचा नियम पाळतो: “देवा मला वेळ / नाही रे जराही / काट्यामागे पाही / धावे जीव”. सगळ्याच मॉडेल्सना हे जमलं असं नाही; काही मसुद्यांत चरण एकेका अक्षराने चुकले.

विनोद. गेल्या वर्षीचा विनोद प्रसंगावर चालायचा, आणि हसायचं कुठे हे कथाच सांगायची: “आणि पुन्हा एकदा हशा पिकला.” शेवटी तात्पर्यही यायचं. यंदा विनोद वाक्यात येतो आणि न सांगता पुढे जातो: “सोसायटीत चौसष्ट सदनिका होत्या आणि निदान अठ्ठ्याऐंशी स्वतंत्र मते होती.”

गेल्या वर्षीचा अंक: सृजनमित्र २०२५ →

अंकाची PDF